छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा , अविनाश गलांडे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल बिनविरोध !!

Foto
शिंदेसेनेला सतेतेपासून दूर ठेवण्यात यश, ठाकरेंच्या 2 सदस्यांना फोडलं

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवडणूक होत आहे. संख्याबळात महायुतीचे पारडे जड असले तरीही भाजप आणि शिवसेना शिंदेच्या नेत्यांकडून आपल्याच पक्षाचा अध्यक्ष व्हावा यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले गेले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर शिंदे सेनेला दूर ठेवत भाजपने अध्यक्ष , उपाध्यक्ष ही दोन्हीही पदे एका हाती आपल्याकडे घेतली आहेत. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने खेळी करत शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला. या रणनीतीसाठी  भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन सदस्य फोडले. त्यामुळे आता भाजपचे अविनाश गलांडे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल हे बिनविरोध निवडून येण्याची शशक्यता आहे. हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान भाजपला उद्धव ठाकरे गटाचे वडगाव कोल्हाटीच्या ललिता सुरेश सोनवणे आणि शिऊरचे संजय निकम हे दोन सदस्य फोडण्यात यश आले. हे दोन्ही सदस्य भाजपला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरु झाल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कोणत्याही सदस्यांनी मतदान करू नये असा व्हीप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी काढला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत तटस्थ राहणार आहेत.

जिल्हा परिषदेत भाजपचे 23 सदस्य आहेत. काँग्रेसचा 1 सदस्य भाजपमध्ये दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या 4 सदस्यांचा पाठिंबा असणार आहे. सोबत प्रहारचा 1, अपक्ष 1 आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे पक्षाचे 2 सदस्य भाजपला पाठिंबा देतील असे संख्याबळ जमावण्यात भाजपला यश आल्याचे सांगितले जात आहे.

बहुमतासाठी 32 संख्या आवश्‍यक आहे तो आकडा भाजप एकटा पूर्ण करेल आणि शिवसेना शिंदे पक्षाचे 23 सदस्य हे बाजूला राहतील. युतीची सत्ता आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पद आमच्याकडे असणार आहे. शिवसेना शिंदे पक्षासोबत आमची बैठक झाली मात्र त्यांना अध्यक्षपद पाहिजे होते. आता आम्ही सत्ता स्थापन करणार असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

ठाकरेंचे दोन सदस्य गायब
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन सदस्य गायब असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही सदस्य भाजपच्या गोटात गेल्याचं सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि ललिता सोनवणे भाजपच्या गोटात गेल्याची माहिती आहे. 

भाजपची मॅजिक फिगर-
भाजप 23 +  राष्ट्रवादी अजित पवार4+  काँग्रेस 1 भाजप प्रवेश केलेला+ अपक्ष 3 उद्धव ठाकरे यांचे 2 सदस्य- 33 संख्याबळ
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील एकूण सदस्य संख्या- 63
अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून येण्यासाठी लागणारे संख्याबळ- 32
भाजप- 23 
एकनाथ शिंदे सेना- 21
उद्धव सेना- 9
राष्ट्रवादी अजित पवार- 4
काँगेस- 1(त्यांनी भाजप प्रवेश केला आहे)
राष्ट्रवादी शरद पवार- 1
अपक्ष- 4